तुळशी मध्ये “लॉकडाऊन काळात” विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग सुरु

Lockdown activity by monali rajurkar

कोरपना तालुक्यातील गट ग्रामपंचायत जेवरा अंतर्गत तुळशी या छोट्याशा गावामध्ये १ ली ते ५वी पर्यंत ची जि प प्रा शाळा आहे. त्यात एकुण ८ विद्यार्थी आहेत. लॉकडाऊनमुळे शाळा बंद आणि ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. मात्र ग्रामिण भागात ऑनलाईन शिक्षणामध्ये अनेक अडचणी येतात. म्हणून गावामध्येच शिक्षीत युवतीच्या माध्यमातून शिकवणी वर्ग सुरु करण्याचे ठरवले. यासाठी पालकांनीही पाठिंबा दिला. या उपक्रमात पुढाकार घेण्यास कु मोनाली राजुरकर (Bsc) ही युवती उत्स्फूर्तपणे तयार झाली. ग्रामपरिवर्तक वैशाली नवरे व युवती मोनाली यांनी घरोघरी जाऊन पालकांना भेटी दिल्या व शासनाच्या कोव्हिड काळातील नियमांचे पालन करुन गावामध्ये शिकवणी वर्ग सुरु केलेत. यासाठी शाळा शिक्षक श्री बोढे सर यांनीही मदत केली. मागील १ महिन्या पासुन गावातील शिकवणी वर्ग सुरळीत चालु आहे. विद्यार्थ्यांना साबण व पाण्याने हात स्वच्छ धुवून रुम मध्ये प्रवेश दिला जातो. विद्यार्थी मास्क लाऊन शिकवणीला येतात. सामाजिक अंतर राखुन विद्यार्थ्यांना बसविले जाते. त्याचा उत्तम रिझल्ट सुद्धा मिळतोय. विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा अभ्यासाची आवड निर्माण झाली. २ तासाच्या शिकवणी वर्गामध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षणाचा अनुभव घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासामुळे पालक वर्ग ही समाधानी आहेत. तसेच गावात परत आल्याने आपल्या शिक्षणाचा फायदा गावातील मुलांना होतोय अशी कृतज्ञता मोनालीने व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *