रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कोलकातावर रॉयल विजय

Royal challengers Bangalore bits Kolkata Knight riders

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ने कोलकाता संघावर ८ विकेट्स राखून रॉयल विजय मिळवला आहे.  या सामन्यात कोलकात्यानं बंगलोरला अवघ्या ८५ धावांचं आव्हान दिलं होतं. बंगलोरच्या फलंदाजांनी हे आव्हान १४व्या षटकातच आठ विकेट्स राखून पार केलं. बंगलोर सध्या १४ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

या मोसमातील आरसीबीचा हा सातवा विजय आहे. यासह ती मुंबई इंडियन्सला मागे ठेवून पॉइंट टेबलमध्ये दुसर्‍या स्थानावर पोहोचली आहे. आरसीबीकडून मोहम्मद सिराजने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत दोन निर्धाव षटकांसह केवळ आठ धावा देऊन तीन बळी घेतले.

मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहलच्या भेदक माऱ्यासमोर कोलकात्याला २० षटकात आठ बाद ८४ धावाच करता आल्या. सिराजनं केवळ आठ धावांत तीन विकेट्स घेतल्या. तर चहलनंही दोन विकेट्स काढून त्याला चांगली साथ दिली. कोलकात्याकडून केवळ तीन फलंदाजांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. कर्णधार ऑईन मॉर्गननं सर्वाधिक ३० धावांचं योगदान दिलं.

विजयासाठी दिलेले लक्ष रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ने दोन गडी गमावून सहज पार केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *