मुंबई कोलकातावरील दमदार विजयसह अव्वल स्थानी

Mumbai win the match with eight wickets

सलामीवीर क्विंटन डी कॉकच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 8 गडी राखून पराभव केला. कोलकाताच्या संघाने पॅट कमिन्सच्या अर्धशतकाच्या मदतीने 148 धावांपर्यंत मजल मारली होती. या विजयासह मुंबईचा संघ पॉईंट टेबलमध्ये 12 गुणांसह अव्वलस्थानी पोहचला आहे.

कोलकाताने दिलेलं 148 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईची सुरुवात दमदार झाली. सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि क्विंटोन डी कॉकने चांगली सुरुवात केली. मात्र, लयीत खेळत असताना कर्णधार रोहित शर्माने झेलबाद झाला. रोहितने 36 चेंडूत 35 धावा केल्या. रोहित जरी संथ खेळत असला तरी डी कॉक फटकेबाजी सुरुच होती. रोहितनंतर आलेला सूर्यकुमार यादवही अवघ्या 10 धावा करुन परतला. त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्या आणि डी कॉकने मुंबईला विजय मिळवूनचं मैदान सोडलं. कोलकाताकडून वरुण चक्रवर्ती आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

कोलकाताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर राहुल त्रिपाठी स्वस्तात बाद झाला. नितीश राणाला लौकिकाला साजेशी खेळी करत आली नाही. 5 धावा करून तो बाद झाला. शुबमन गिल देखील चुकीच्या फटक्यामुळे झेलबाद झाला. त्याने 23 चेंडूत 21 धावा केल्या. पुढच्याच चेंडूवर दिनेश कार्तिकही 4 धावांवर बाद झाला. राहुल चहरने 2 चेंडूमध्ये 2 बळी घेत कोलकाताला मोठा धक्का दिला.

फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला आंद्रे रसल आजही फेल ठरला.त्याने अवघ्या 12 धावा केल्या. निम्मा संघ लवकर तंबूत परतल्यानंतर कर्णधार इयॉन मॉर्गन आणि अष्टपैलू पॅट कमिन्स या जोडीने कोलकाताचा डाव सावरला आणि अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहत संघाला 148 पर्यंत मजल मारून दिली. पॅट कमिन्सने पहिले अर्धशतक ठोकले. त्याने 36 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 53 धावा केल्या. कर्णधार मॉर्गनने 29 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 39 धावा केल्या. मुंबईकडून राहुल चहरने दोन गडी बाद केले तर जसप्रीत बुमराह, नॅथन कुल्टर-नाइल आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *