महाविकास आघाडी सरकारच्या काळात वाढत्या महिला अत्याचाराच्या विरोधात भाजपा महिला आघाडी तर्फे आक्रोश आंदोलन.

Tajya Marathi batmya

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेबाबतचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. मागील काही महिन्यात राज्यात महिलांवरील अत्याचार, बलात्कार, विनयभंग व हत्याकांडाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कोरोना महामारी सारख्या अतिसंवेदनशील काळात ही कोविड सेंटर व दवाखान्यात महिलांवरील अत्याचार, बलात्कार व विनयभंगांचे सत्र सुरूच आहे. महाराष्ट्रात महिला असुरक्षित असतांना देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सरकार मूग गिळून बसले आहे.

इतर राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणारे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र महाराष्ट्रात वाढत असलेल्या महिला अत्याचारावर गप्प आहेत. महिलांप्रती बेगडी सन्मान असलेले काँग्रेस नेते महाराष्ट्रातील महिला अत्याचार प्रकरणांवर मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टी महिला आघाडी व युवा मोर्चा कोरपना तालुक्याच्या व गडचांदूर शहरातर्फे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रोश आंदोलन करत, महिला सुरक्षा कायदा अधिक मजबूत करण्याची मागणी केली. या संदर्भात महिला आघाडी व युवा मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसील प्रशासनातर्फे निवेदन देण्यात आले. तेलंगणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात महिला सुरक्षेसाठी दिशा कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी माजी नगराध्यक्षा विजयालक्ष्मी डोहे यांनी केली आहे.

या प्रसंगी भाजपा महिला आघाडीतर्फे माजी नगराध्यक्षा विजयालक्ष्मी डोहे,माजी उपनगराध्यक्षा आनंदीताई मोरे,महिला आघाडीच्या नेत्या रंजना मडावी,महिला आघाडी शहर अध्यक्षा नीताताई क्षीरसागर,सपना सेलोकर,संगीता गोरड वार,सौ पारखी,सौ कोरेताई,सौ जयश्रीताई शेंडे,सौ पेंदोर ताई,नगरसेवक अरविंद डोहे, रामसेवक मोरे,जेष्ठ नेते शिवाजी शेलोकर,पंचायत समिती सदस्य नूतन जीवने,संजय मुसळे,संदीप शेरकी, भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने,तालुका अध्यक्ष रोहन काकडे,महादेव एकरे,सुधाकर बोरीकर,अजीम बेग सत्यवान चामाटे ,प्रमोद कोडापे,तुषार देवकर,निखिल भोंगळे, साजिद उमरे,उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *