ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणूक झाल्याने तरुणाची आत्महत्या.

Student suicide due to fraud in online shopping

आँनलाईन शॉपिंग ला सध्या मोठ्या प्रमाणात चालना मिळत असून अनेक लोकांची ऑनलाईन खरेदी करतांना फसवणूक देखील होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. अशीच घटना चंद्रपूर जिल्ह्यात समोर आली आहे. सध्या कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे शाळा बंद आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात येत आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल  मागवला होता पण ऑनलाइन खरेदीत फसवणूक झाली. याच्या नैराश्यातून मुलाने केली आत्महत्या केली. ऑनलाईन मोबाईल खरेदीत फसवणूक झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका तरुणांने टोकाचे पाऊल उचलत थेट आत्महत्या केली. 

चिमूर तालुक्यातील पूयारदंड भागातल्या रोहित राजेंद्र जांभुळे या युवकाने हे टोकाचे पाऊल उचलले. काही दिवसांपूर्वी त्याने ऑनलाईन १५ हजार रुपयांच्या मोबाईलची खरेदी केली त्यासाठी त्याने ऑनलाईन १० हजार रुपये भरले आणि उर्वरित ५ हजारांची कशीबशी जुळवाजुळव केली. मात्र प्रत्यक्षात जेव्हा पार्सल घरी आले तेव्हा त्यात २ रुपयांची रिकामी पाकिटे, एक बेल्ट आणि खरड्याचा तुकडा अशा वस्तू आढळल्या. त्यामुळे निराश झालेल्या रोहितने घराजवळील विहिरीत झोकून आत्महत्या केल्याची घटना समोर आली.

बारावीत शिकत असलेल्या रोहितने ऑनलाईन शिक्षणासाठी हा मोबाईल विकत घेण्याचा हट्ट केला होता. त्यामुळे त्याच्या शिक्षणासाठी मोबाइल घेतला परंतु त्याची फसवणूक झाल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले. सदर प्रकरणाचा तपास पोलिस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *