केंद्रिय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन, दिल्लीतील एस्कॉर्ट्स हॉस्पिटलमध्ये घेतला शेवटचा श्वास.

Union Minister Ram Vilas Paswan passes away

केंद्रीयमंत्री रामविलास पासवान यांचे निद्धन झाले असून त्यांनी ७४व्य वर्षी दिल्लीतील एस्कॉर्ट्स  हॉस्पिटलमध्ये आपल्या आयुष्याचा शेवटचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. शनिवारी त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली आहे.

याबाबतची माहिती त्यांचे पुत्र लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी ट्विट द्वारे दिली. ”  “पप्पा… तुम्ही या जगात नाहीत पण मला माहित आहे की तुम्ही जिथे आहात सदैव माझ्यासोबत आहात” असं ट्वीट चिराग पासवान यांनी केलं.

रामविलास पासवान यांच्या निधनावर अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला असून यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, केंदिय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे इत्यादी नेत्यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या देशात कदाचित कधीच भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. राम विलास पासवानजी यांचे निधन वैयक्तिक हानी आहे. मित्र, आणि गरीबांना सन्मानपूर्वक जीवन प्रदान करण्यासाठी झटणारा मौल्यवान सहकारी मी गमावला आहे. अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *