MPSC ची परीक्षा रद्द, लवकरच नवीन तारखा होणार जाहीर

Mpsc exam cancelled

मराठा आरक्षणावरून सध्या एमपीएससी परीक्षेचा वाद राज्यात चालू आहे. उदयनराजे यांनी मराठा आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत एमपीएससीची परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. त्याच बरोबर इतर मराठा नेत्यांनी देखील याबाबतची मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर एमपीएससी ची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यावेळी दिली.

काही काळासाठी सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून लवकरच एमपीएससी च्या नवीन तारखा जाहीर करण्यात येईल असे देखील यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. कोणताही विद्यार्थी पुढील परीक्षेसाठी अपात्र ठरणार नसल्याचे देखील ते म्हणाले. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी थोडा वेळ मिळायला हवा असे देखील ते यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *