राजुरा,जिवती,कोरपना हे तालुके चना (हरभरा) एन.एफ.एस.एम.मार्फत रब्बी २०२०-२०२१ समाविष्ट करण्याची माझी आमदार संजय धोटे यांची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी

Latest news in chandrapur

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा,जिवती,कोरपना हे तालुके चना ( हरभरा )एन.एफ.एस.एम. मार्फत रब्बी २०२०-२१ मधून वगळण्यात आले असून रब्बी हंगामात समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार अँड संजय धोटे यांनी मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

शेतकरी आर्थिक हलाखीच्या परिस्थितीचा सामना करत आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे रोख पिक कापूस, सोयाबीन,यासाठी यावर्षी रब्बी हंगामात सबसिडी वर मिळणारे एन.एफ.एस.एम.रब्बी २०२०-२०२१ मधून चना ( हरभरा ) हे बियाणे या योजने मधून राजुरा, कोरपना,जिवती हे तालुके वगळण्यात आले आहे.या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची पेरणी होते.अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावा लागणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा रब्बी २०२० मध्ये या तिनही वगळलेल्या तालुक्यांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे माजी आमदार अँड धोटे यांनी केली आहे.याबाबत शेतकरी हिताचा त्वरित योग्य विचार करून सहकार्य करावे व शेतकरी बांधवांना न्याय द्यावे,तसेच माजी अर्थमंत्री आमदार मा.सुधीर मुनगंटीवार यांना सुध्दा याविषयी संदर्भात निवेदन देवून मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *