अखेर रीया चक्रवर्तीचा जामीन मंजूर.

Riya chakrawarti bail approved by high court

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरनातील चौकशीदरम्यान ड्रग्स प्रकारात अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रीया चक्रवर्ती हिला अखेर हायकोर्टाने दिलासा दिला असून रीया चक्रवर्ती हिला अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर रियाचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. परंतु, एनसीबीकडे पासपोर्ट जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच सुटकेनंतर दहा दिवस जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावावी आणि कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये, असे आदेश उच्च न्यायालयाने रियाला दिले आहेत. कोर्टाने दोन वेळा रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडी वाढवली होती. त्यानंतर आता रियाचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *