जोरदार चर्चा…! भाजपाचे जेष्ठनेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

tajya marathi batmya

राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खमंग चर्चा चालू असून राज्यातील भाजपाच्या नेतृत्वावर सतत टीका करणारे भाजपाचे जेष्ठनेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा चालू आहे. येत्या काळात त्यांच्या एका निर्णयामुळं राजकीय पटलावर मोठं वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या महितीनुसार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असणाऱ्या बैठकीमध्ये या बाबत चर्चा होणार असून, त्याबाबतचा निर्णयही होणार असल्याचं म्हटलं जात आहे. जळगावमध्ये राष्ट्रवादीची कमी होणारी ताकद वाढवण्यासाठी खडसेंपुढे प्रस्ताव मांडणं हे राष्ट्रवादीच्या दृष्टीनं फायद्याचं ठरु शकतं असे मत राजकीय अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि खडसे या समीकरणात मीठाचा खडा पडला असून किंबहुना खुद्द खडसे यांनी कित्येकदा आपली नाराजी बोलूनही दाखवली आहे. इतकंच नव्हे, तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत नाराजीचा सुर आळवल्याचंही पाहायला मिळालं आहे. त्यामुळं ते अखेर पक्षातून काढता पाय घेणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जवळपास ४५ वर्षांहून अधिक काळ भाजपमध्ये काम केले असून एकनाथ खडसे गेल्या काही काळापासून पक्षावर नाराज आहेत. पक्ष नेतृत्वाकडून आपल्याला डावललं जात असल्याची खंत त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती. त्यामुळं नाराज एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार का? अशा चर्चेनं जोर धरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *