शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण.

Education minister Varsha gayakawad tested Corona positive

राज्यातील कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढत असून राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी कोरोनाची लागण झाली. त्यातच आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतःच ट्वीट करत याबाबत माहिती दिली.

वर्षा गायकवाड यांनी ट्विट मध्ये, “नमस्कार, आज माझ्या तपासणीदरम्यान मला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यामुळे मी बरी आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे कोरोना चाचणी करुन घ्यावी. सुरक्षित राहा. काळजी घ्या.” असे सांगीतले.

देशात ४४ लाख ९० हजार रुग्ण कोरोनामुक्त

जगात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना भारतात तब्बल ४४ लाख ९० हजार लोक कोरोनामुक्त झाले असून कोरोना रिकव्हरी रेटही ८० टक्क्यांच्या वर गेला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ही माहिती दिली. सोमवारी दिवसभरात तब्बल १ लाखांच्या वर रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. महाराष्ट्रातही सोमवारी तब्बल ३२ हजारांच्या वर रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *