मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबतची ‘ ती ‘ बातमी पूर्णपणे खोटी.

Raj Thackeray clarify about current news issue

गेल्या काही दिवसांपासून काही वृत्तपत्र व चॅनल्स नी राज ठाकरे यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क न लागल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आल्याचे वृत्त चालविली होती मात्र ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले आहे.

काय आहे प्रकरण?

एका इंग्रजी दैनिकात आलेल्या बातमीनुसार राज ठाकरे आपले कुटुंब आणि मित्रांसोबत गेल्या शुक्रवारी मुंबई-मांडवा रो-रो फेरीने अलिबागला जात असताना हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. रो-रो बोटीत प्रवाशांनी धुमप्रान करु नये आणि मास्क परिधान करावा, अशी सूचना होती. मात्र, राज ठाकरे बोटीवरच्या मोकळ्या जागेत मास्क न घालता उभे होते आणि काही वेळाने त्यांनी सिगारेटही पेटवली. राज ठाकरे हे सिगारेट पित असल्याचे आणि मास्क घातल्याचे बोटीवरील कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात आले त्यानंतर ते राज ठाकरे यांच्याकडे गेले आणि रो रो बोटच्या नियमांविषयी त्यांना सांगितले. राज ठाकरे यांना आपली चूक लक्षात येताच त्यांनी दिलगिरी व्यक्त करत एक हजार रुपयांचा दंड भरला असे वृत्त काही वृत्तपत्र आणि चॅनल्स नी चालविले होते.

मात्र ही बातमी पूर्णपणे खोटी असून प्रवासादरम्यान राज ठाकरे यांच्यासोबत असे काही घडलेच नाही. असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी राज ठाकरे बाबत खोटी बातमी लावलेल्या वृत्तपत्र व चॅनल्स ना खुलासा करण्याचे पत्र देखील पाठविले असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *