संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात सात दिवसांसाठी जनता कर्फ्यु होणार लागू

Janata curfew will announce in chandrapur district for seven days

सुरवातीला कोरोनापासुन दूर राहिलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ८ हजारांच्या घरात गेली असून चंद्रपुरात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची संख्या देखील शंभरावर पोहचली आहे.

याच पार्श्वभूमीवर आज २१ सप्टेंबरला नियोजन इमारतीत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनातील लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटना, जिल्हा अधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत पुन्हा एकदा जिल्ह्यात वाढत्या कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी ‘जनता कर्फ्यू’ लावण्याचा निर्णय घेण्यात आला. 

जनता कर्फ्यु हा २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात एक आठवडा सार्वजनिक कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *