राज्यसभेत गोंधळ करणारे आठ खासदार निलंबित.

Eight members of parliament suspended for seven days

राज्यसभेत कृषी विधेयका वरून गोंधळ करणाऱ्या आठ खासदारांना निलंबित करण्यात आले असून काँग्रेसच्या राजीव सातव यांच्यासह आठ खासदारांचं एक आठवड्यासाठी निलंबन करण्यात आलं आहे. त्यामुळे आता हे खासदार संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजात सहभागी होऊ शकणार नाहीत.

विरोधी खासदारांनी वेलमध्ये येऊन गोंधळ घातला आणि रुल बुक फाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यसभचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांचं सात दिवसांसाठी निलंबन केले आहे.

निलंबित केलेल्या खासदारांमध्ये संजय सिंह (आम आदमी पक्ष), के के रगेश (माकप), सय्यद नासिर हुसेन (काँग्रेस), राजीव सातव (काँग्रेस), डेरेक ओ ब्रायन (तृणमूल काँग्रेस), रिपुन बोरा (काँग्रेस) डोला सेन (तृणमूल काँग्रेस आणि एलामराम करीम (माकप) या खासदारांचा समावेश आहे.

दरम्यान शेतकऱ्यांशी संबंधित दोन विधेयकं मंजूर करण्यात आली आहेत. कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, जीवनावश्यक वस्तू (दुरुस्त) विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक लोकसभेत मंजूर झाली होती. यातील कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक २०२०, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक २०२० ही विधेयकं राज्यसभेत देखील मंजूर झाली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *