खळबळजनक. ! पोलिस अधिकाऱ्यांनी केला ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न गृहमंत्र्यांच्या दावा.

Latest news in Maharashtra

राज्यातील ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न काही आयपीएस अधिकाऱ्यांनी केला मात्र तो आपण वेळीच हाणून पाडला असा खळबळजनक दावा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. यावर आपण जाहीरपणे वक्तव्य करू इच्छीत नाही. असे म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांवर आपली नाराजी व्यक्त केली. एका मुलाखतीत त्यांनी हा गौप्यास्फोट केला.

मिळालेल्या माहितीनुसार चार ते पाच वरीष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला असून आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या असे सांगणे, तुमच्या फाईली आमच्याकडे आहे. अशी विधाने करणे असे प्रकरण समोर आले. त्यानंतर खुद्द शरद पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात चर्चा होऊन सदर प्रकरण योग्य पद्धतीने मार्गी लावण्यात आले. असे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *