ब्रेकिंग न्यूज. ! भाजपा नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण.

Sudhir mungantiwar tested Corona positive

राज्याचे भाजपा नेते तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण झाली. त्यांनी स्वतः याबाबतची माहिती सोशल मीडिया द्वारे दिली असुन आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन केले.

चंद्रपुरातील त्यांचे वास्तव असलेल्या गिरनार चौक परिसरातील कन्यका मंदिर बोळी परिसरात गेल्या आठवड्यात ३ कोरोना बाधित व त्यांचे २ सुरक्षा रक्षक बाधित आढळले होते .

आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात गेल्या २४ तासात नव्याने २४५ बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता ७ हजार ५२४ वर पोहोचली आहे.यापैकी ४ हजार २८१ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३ हजार १३४ बाधितांवर उपचार सुरू आहे. यापैकी, होम आयसोलेशनमध्ये ७२३ जण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *