राष्ट्रवादीच्या आमदाराने मारली पोटावर लाथ, आमदारवर गुन्हा दाखल.

ncp mla kick on stamach

राष्ट्रवादीचे अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे याच्या विरोधात एका ग्रामस्थाने तक्रार केली असून सादर तक्रारीत भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाला टोकल्याच्या रागातून पोटात लाथ मारल्याची तक्रार एका ग्रामस्थाने केली आहे.

यासंबंधी रामदास लखा बांडे (वय ४०, रा. खडकी, ता. अकोले) यांनी तक्रार दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, खडकी गावातून आपण पायी जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने एक गाडी आली. आम्हाला कट मारून ती पुढे गेली. कोणी तरी पर्यटक असावेत म्हणून आम्ही जोरात ओरडून गाडी हळू चालवा असे म्हणालो. त्यावर काही अंतरावर जाऊन ती गाडी थांबली. त्यातून आमदार लहामटे उतरले व म्हणाले, मला ओळखले का मी कोण आहे. असे म्हणून माझ्या पोटात त्यांनी लाथ मारली व शिवीगाळ करून ते निघून गेले.

रामदास बांडे यांच्या तक्रारीवरून राजूर पोलीस ठाण्यात आमदार लहामटे यांच्याविरूद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *