प्रतीक्षा संपली ! थोड्याचं वेळात चालू होणार आयपीएलच्या १३व्या मोसमातील थरार

IPL will start from few minutes

देशात असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे यंदाची आयपीएल चांगलीच चर्चेत राहिली. भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाची आयपीएल ही यूएई मध्ये खेळविण्यात येत आहे. थोड्याच वेळात आयपीएलच्या १३ व्या मोसमाचा थरार रंगणार असून आयपीएलच्या या हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जस यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्याला अवघ्या काही तासांनी सुरुवात होणार आहे. हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे. मुंबईच्या नेतृत्वाची जबाबदारी हिटमॅन रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. तर चेन्नईची जबाबदारी अनुभवी आणि कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी सांभाळणार आहे.

कुठे पाहता येणार सामना ?


कोरोनामुळे यंदा क्रिकेट चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन सामन्याचा आनंद घेता येणार नाही. मात्र त्यांना स्टार स्पोर्ट्सवर (Star Sports) थेट सामने पाहता येणार आहेत. तसेच मोबाईल युझर्सना डिज्नी हॉटस्टार (Disney Hotstar) आणि जिओ अॅपवर (Jio App) लाईव्ह मॅच पाहता येणार आहे.

आज होणार्याआ सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर सर्वांचीच नजर असणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पहिल्यांदाच धोनी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे धोनी कशाप्रकारे खेळतो याकडे सर्वांचंच लक्ष असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *