चीनच्या कोणत्याही कारवाहिला उत्तर देण्यास भारतीय सेना एलएसीवर तयार – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज राज्यसभेत भारत-चीन सीमेवरील स्थितीची माहिती दिली. त्यावेळी त्यांनी भारतीय सैनिक एलएसीवर चीनकडून होणार्या. कोणत्याही कारवाहिला उत्तर देण्यास सज्ज असल्याचे सांगितले. पुढे संरक्षणमंत्री म्हणाले की, शांतता आणण्यासाठी अनेक करार केले. चीन औपचारिक सीमा स्वीकारत नाही. त्यांच्या बोलण्यात आणि करण्यात फरक आहे. आपल्या जवानांनी गलवान खोऱ्यात चीनला मोठे नुकसान पोहचवले आहे.

वेळोवेळी चीनकडून चिथावणीखोर कारवाई करण्यात आली आहे. आपले सैन्य एलएसीवरील कोणत्याही कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहे. सैन्य सीमेवर मजबूतीने उभे आहे. चीनकडून सर्वात प्रथम सैन्य कारवाई करण्यात आली होती, मात्र आपण त्यांच्या हेतूमध्ये यशस्वी होऊ दिले नाही. आम्हाला हा प्रश्न शांततेने सोडवायचा आहे आणि चीनने आपल्याबरोबर कार्य करावे अशी आमची इच्छा आहे.

राजनाथ सिंह संसदेत म्हणाले की, मी १३० कोटी देशवासियांना आश्वस्त करू इच्छितो की आम्ही देशाची मान खाली घालणार नाही. आपल्या देशाबद्दलचा हा आमचा निर्धार आहे. जवान कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी पुर्णपणे तयार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *