मोठी बातमी. ! नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण

Nitin gadkari tested Corona positive

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली असून याबाबतची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिली. त्यांनी ट्वीट करुन सांगितलं की, “काल मला अशक्तपणा जाणवत होता. त्यानंतर मी डॉक्टरांचा सल्ला घेतला. तपासणी केल्यानंतर माझी कोविड १९ ची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

नितीन गडकरी यांनी पुढे म्हटलं की, सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा सोबत असून मी ठिक आहे. मी स्वत:चं विलगीकरण करुन घेतलं आहे. मी सर्वांना विनंती करतो की जे माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी सावधगिरी बाळगून नियमांचे पालन केले पाहिजे. सुरक्षित रहा.

आतापर्यंत मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *