युवकांनो तयारीला लागा ! राज्य सरकार घेणार १२५०० पदांची पोलीस भरती.

maharashtra goverment taking big police bharti

राज्यातील युवकांसाठी दिलसदायक बातमी असून राज्य सरकार राज्यात नवीन १२,५०० पदांसाठी पोलीस भरती घेणार आहे. महाराष्ट्र सरकारने पोलीस दलातील ‘पोलीस शिपाई’ संवर्गातील 12,500 पदांच्या मेगा भरतीच्या प्रस्तावाला आज मंजूरी दिली आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देखमुख यांनी दिलेल्या महितीनुसार जुलैमध्ये राज्य सरकार पोलीस दलामध्ये १२,५३८ पदांसाठी भरती करणार आहे. पोलीस भरतीबाबतच्या या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना संधी मिळेल, असा विश्वासही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला. तसंच लवकरच या भरतीसाठीची प्रक्रिया सुरू होईल, असं ते म्हणाले. डिसेंबर अखेरपर्यंत पुर्ण प्रक्रिया पार पडेल असे त्यांनी सांगितले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि पोलिस दलावरील तणाव कमी करण्यासाठी १०,००० शिपाई पदाची भरती केली जाणार असल्याचे म्हटले होते.

राज्यातील युवकांसाठी दिलसदायक बातमी असून राज्य सरकार राज्यात नवीन १२,५०० पदांसाठी पोलीस भरती घेणार आहे. महाराष्ट्र सरकारने पोलीस दलातील ‘पोलीस शिपाई’ संवर्गातील 12,500 पदांच्या मेगा भरतीच्या प्रस्तावाला आज मंजूरी दिली आहे.

कोरोना संकटाच्या काळात एकीकडे बेरोजगारीमध्ये वाढ होत असताना सरकारच्या या मेगा भरतीमुळे तरूण-तरुणींना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच राज्यातील पोलिसांवर असलेला अतिरिक्त भर देखील कमी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *