वर्ध्यातील नववीच्या रंचोने बनविली सौर उर्जेवर चालणारी लिटिल कार.

solar car made by school student

वर्ध्यातील नववीमध्ये शिकणार्‍या मुलाने लॉकडाउनमध्ये आपली शक्कल लावली असून त्याने लॉकडाउनमध्ये भन्नाट काम केलं आहे. निखिल सोमनाथे या नववीतील विद्यार्थ्याने अवघ्या ३० दिवसात सौर ऊर्जेवर चालणारी लिटील कार बनवली आहे. लॉकडाऊनच्या काळात वेळ घालवत मनातील संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवत या चिमुकल्याने ही कार बनवली. अवघ्या ३० दिवसात ही कार तयार केली असून आता ही कार रस्त्यावर धावायलाही लागली आहे.

कोरोनामुळे जगभरात लॉकडाऊन होता, अशा परिस्थितीत निखिलने वेळ घालवण्यासाठी स्वत:चीच संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. ही कार बनविण्यासाठी सर्व साहित्य त्याने सायकलच्या दुकानातून आणले. लहान सायकलच्या चाकाच्या साहाय्याने लोखंडी रॉड, लाकडी प्लायवूड ,बॅटरी,जुन्या चार चाकी गाडीचे स्टिअरिंग अशा वस्तूंचा वापर करत त्याने ही कार बनवली आहे.

या कारचे अनेक फायदे असल्याचे निखिलने सांगितले. निखिलने बनवलेली ही कार पूर्णत: प्रदूषण मुक्त आहे. ही कार बनवण्यासाठी २० हजार रुपये खर्च आला. ही कार एकूण १०० किलोपर्यंत वजन वाहू शकते. या कारमध्ये सोलर पॅनलचा उपयोग केला आहे. या सोलर पॅनलच्या सहाय्याने ही कार चार्ज होऊ शकते. कारची बॅटरी संपत असल्यास रनिंगमध्ये तिला बॅकअप मिळत राहतो. महत्वाचे म्हणजे निखिलला लहानपणापासूनच अशी उपकरणे बनवण्याचा छंद आहे. त्याने आतापर्यंत आर.सी. रिमोट कंट्रोलर मोटर बोर्ड, रिमोट कंट्रोल ड्रोन, पेरणी यंत्र ,सोलर कुलर अशी यंत्रं बनवली आहेत. आता निखिलने केलेला लिटिल कारचा प्रयोग सर्वांचे लक्ष वेधून घेतोय, पेट्रोल डिझेलला उत्तम पर्याय ठरलेली ही कार आर्षणाचा केंद्र बनली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *