एका महिन्यात येणार कोरोनाची लस, डोनाल्ट ट्रम्प यांचा दावा.

corona virus vaccine available in news month donalt trump said

कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाची लस शोधण्यासाठी जगभरातील देश अहोरात्र मेहनत करत आहे. या महामारीचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत लसींवरील ट्रायल शेवटच्या टप्प्यात सुरू आहे. यातच आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, पुढील एका महिन्यात कोरोनाची लस येऊ शकते. महामारी आपोआप समाप्त होईल, असेही ते म्हणाले.

अमेरिकेत सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. यातच प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले की, लस बनवण्याच्या आपण खूपच जवळ पोहचलो आहोत. केवळ काही आठवडे बाकी आहेत. यात ३-४ आठवडे लागू शकतात. दरम्यान, हे वक्तव्य करण्याच्या काहीतास आधीच एका वृत्तवाहिनीशी बोलताना ट्रम्प यांनी लस येण्यासाठी ४ ते ८ आठवडे लागू शकतात, असे म्हटले होते.

दुसरीकडे ट्रम्प यांचे विरोधक निवडणुकीत लभा व्हावा यासाठी राष्ट्रपती लस बनविण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *