आग्र्यातील बनत असलेलं मुघल म्युझियम आता छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाणार.

The Mughal Museum being built in Agra will now be known as Chhatrapati Shivaji Maharaj Museum

उत्तर प्रदेशातील योगी सरकारने पुन्हा एकदा एक मोठा निर्णय घेतला असून आग्रा येते बनत असलेल्या मुघल म्युझियम ला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात येणार आहे. याअगोदर अलाहाबादचं नामांतर प्रयागराज, फैजाबाद बनलं अयोध्या, मुघलसरायचं नाव बदलून दीनदयाल उपाध्याय नगर  असे नामकरण करण्यात आले होते.

ताजमहलमुळे जगभरात प्रसिद्ध असलेल्या आग्र्यात सध्या मुघल म्युझियमचं बांधकाम होत आहे. परंतु योगी सरकारने आता या म्युझियमचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला असून हे मुघल म्युझियम आता मुघलांना आव्हान देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखलं जाणार आहे. आग्र्यातील विकास कामांचा आढावा घेताना स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली.

सदर निर्णयाची माहिती योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवरुन दिली. त्यांनी लिहिलं आहे की, “आग्रामध्ये सुरु असलेलं म्यूझियम आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखलं जाईल. तुमच्या नव्या उत्तर प्रदेशात गुलामीच्या मानसिकतेच्या प्रतिकांचं कोणतंही स्थाना नाही. आपल्या सगळ्यांचे नाकय शिवाजी महाराज आहेत. जय हिंद, जय भारत.”

यूपी सरकारने या म्युझियमद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांचं वैभव संपूर्ण जगभरात पोहोचवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. सरकारने पर्यटन विभागाच्या अधिकारिऱ्याच्या माध्यमातून म्युझियममध्ये मराठा साम्राज्याच्या तमाम वस्तू प्रदर्शनाला ठेवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच आग्र्यात बनणाऱ्या या म्युझियममध्ये मुघलकालीन वस्तु आणि दस्तऐवज प्रदर्शित केले जातील, अशी माहिती पर्यटन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. याशिवाय पर्यटकांसाठी इथे विशेष सुविधांची व्यवस्था करण्यासही सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *