गृहमंत्री अमित शाह यांची प्रकृती पुन्हा बिघडली, रात्री उशिरा एम्स मध्ये दाखल.

Home minister Amit Shah admitted to Delhi aaims hospital again

केंद्रीय गृहमंत्री यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. मात्र त्यानंतर देखील त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अशाच परिस्थितीत त्यांना पुन्हा एकदा एम्स मध्ये दाखल करण्यात आले आहे. काल रात्री ११ वाजता अमित शाह यांना दिल्ली येथील एम्समध्ये दाखल करण्यात आले.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोनावर मात केल्यानंतर अमित शाह यांना श्वास घेण्यास त्रास होत असून पुन्हा काही काळ त्यांना रूग्णालयात उपचारासाठी राहावे लागणार आहे. रुग्णालयात त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीत चांगले उपचार होतील असे एम्स मधील एका सूत्राने सांगितले.

अमित शाह यांना १८ ऑगस्टला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी देखील त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे समोर आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *