शिवसैनिकांनी मारहाण केलेल्या निवृत्त नौदल अधिकार्‍याची संरक्षणमंत्र्यांकडून विचारपूस.

Defense minister talk with naval officer who was beaten by shivsainik

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र व्हाट्सअप ग्रुप वर फॉरवर्ड केल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर हल्ला केला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी अटक करण्यात आली. नंतर या आरोपींना जामीन देखील मिळाला. राज्यात हे प्रकरण चांगलेच तापले असताना, केंद्रापर्यंत देखील पोहचले आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज या निवृत्त अधिकाऱ्याशी फोनवरून चर्चा करत चौकशी केली.

राजनाथ सिंह यांनी ट्विट करत माहिती दिली की, मुंबईत गुंडांनी हल्ला केलेल्या सेवानिवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्याशी बोललो. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. माजी सैनिकांवर होणारे अशा प्रकारेचे हल्ले हे पूर्णपणे अस्वीकार्य आणि दु: खद आहे.

दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपवर उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र शेअर केल्याने काल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून 65 वर्षीय निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणात कमलेश कदम संजय शांताराम मांजरे , राकेश राजाराम बेळणेकर, प्रताप मोतीराम सुंद वेरा , सुनिल देसाई आणि राकेश कृष्णा मुळीक यांना अटक करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *