काय सांगता ! मे महिन्याच्या अखेरपर्यंत ६४ लाख लोकांना होऊन गेला कोरोना

Janata curfew will announce in chandrapur district for seven days

देशामध्ये मे महिन्याच्या अखेर पर्यंत तब्बल ६४ लाख लोकांना कोरोना होऊन गेल्याची धक्कादायक माहिती इंडियन कौसिल ऑफ मेडिकल रेसर्च ने दिली आहे. देशातील अनेक लोकांना कोरोनाचे निदान झाले नव्हते. यातून बरे झालेल्यांच्या शरीरात अँटी बोडीज तयार झाले असल्याचे आयसीएमआर ने सेरोलॉजीकल सर्वेक्षणाच्या निष्कर्षात म्हटले आहे.

मे महिन्यात कोरोना चा एक रुग्ण जरी आढळला तरी वास्तवात ८० ते १३० लोकांना कोरोनाची बाधा झाली होती. मात्र निदान न झाल्याने हा आकडा समोर आला नसल्याचे आयसीएमआर सांगितले. कोरोना झालेल्या आणि त्यांचे निदान न झालेल्या लोकांचे १८ ते ४५ वयोगटातील प्रमाण ४३.३% ४६ ते ६० वयोगटातील ३९.५% तर ६० वर्षांवरील वयोगटातील प्रमाण १७.२% इतके होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *