रीया चक्रवर्ती सह अन्य आरोपींचा जामीन कोर्टाने फेटाळला.

Riya Chakraborty and other accused were denied bail by the court.

चित्रपट अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्यासह सर्व आरोपींची जामीन याचिका मुंबईच्या कोर्टाने शुक्रवारी फेटाळून लावली. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर रियाला आता २२ सप्टेंबरपर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे. रिया आणि शौविक यांना ड्रग कंट्रोल ब्युरोने (NCB) अटक केली. 


या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या बंदी घातलेल्या औषधांचे प्रमाण कमी असले तरी ते व्यावसायिक प्रमाण होते आणि त्यांची रक्कम १,८५,२०० रुपये असल्याचे एनसीबीने गुरुवारी जामीन अर्जाच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला.

न्यायालयाच्या या निर्णयानंतर रियाचे वकील सतिश मानशिंदे सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी जामीन अर्जावरील सर्व युक्तीवाद पूर्ण झाले होते. आज शुक्रवारी न्यायालयाने आपला निर्णय सुनावत रियासह शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत, झैद विलात्र आणि अब्दुल बासित परिहार यांनाही जामीन मंजूर केला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *