संजय राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा – नवनीत राणा

Navneet rana on Sanjay raut

सध्या कंगना आणि शिवसेना यांच्यातील घमासान चालू असून हा वाद दिवसेंदिवस वाढतच जात आहे. यामध्ये आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उडी टाकली असून त्यांनी संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणावत यांच्या बद्दल केलेले  वक्तव्य निषेधार्ह असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राऊत यांचा तातडीने राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

खासदार नवनीत राणा यांनी अभिनेत्री कंगना राणावतची बाजू घेत राज्य सरकारवर टीका केली आहे. कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. ही अत्यंत चुकीची कारवाई आहे. कंगनाच्या ऑफिसवर कारवाई करायला ते आज तयार झालेलं नाही. दोन वर्षांपूर्वी कंगनाचं हे ऑफिस तयार झालेलं आहे. पण त्यावर आज कारवाई केली जात आहे. केवळ कंगनाने भूमिका घेतली म्हणून तिच्या कार्यालयावर कारवाई केली जात आहे. या सर्व गोष्टींना शिवसेना नेते संजय राऊत जबाबदार असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत हे राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांनी महिलांबद्दल सार्वजनिक ठिकाणी बोलताना निश्चितच भान ठेवायला हवं होतं. महिलांबद्दल बोलताना मानमर्यादा ठेवून बोललं पाहिजे. खासदार असूनही महिलांना शिवीगाळ करणं, त्यांच्याविषयी अपशब्द वापरणं योग्य नाही, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राऊत यांची पाठराखण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. राऊत यांचं समर्थन करायचं असेल तर मुख्यमंत्र्यांनी उघडपणे त्यांचं समर्थन करावं अन्यथा राऊत यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा घ्यावा. ही केवळ माझीच मागणी नाही तर महाराष्ट्रातील तमाम महिला वर्गांची ही मागणी आहे, असं राणा म्हणाल्या. शिवसेनेच्या मुखपत्रातून नेत्यांवर कोणत्याही भाषेत शेरेबाजी केलेली चालते. तेव्हा कारवाई होत नाही आणि कंगनावर मात्र तात्काळ कारवाई करण्यात येत आहे, हे कोणतं धोरण?, असा सवालही त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *