कोरोनाचे गेल्या २४ तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्ण, कोरोनाचा देशातील कहर वाढतोय.

Janata curfew will announce in chandrapur district for seven days

देशातील कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर होत असून गेल्या २४ तासांत आत्तापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. गेल्या २४ तासांत रेकॉर्ड ब्रेक ९५ हजार ७३५ नवीन रुग्ण सापडले. आतापर्यंत एका दिवसात सापडलेल्या कोरोना रुग्णांचा हा आकडा सर्वात जास्त आहे. याआधी ६ सप्टेंबर रोजी ९३ हजार ७२३ कोरोना रुग्ण सापडले होते. तर एका दिवसात ११७२ जणांचा मृत्यू झाला. यासह एकूण मृतांची संख्या ७५ हजार ६२ झाली आहे.

यात दिलासादायक बाब म्हणजे भारत हा जगातला दुसरा देश ठरला आहे, जेथे सर्वात जास्त रुग्ण निरोगी झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार देशात ३४ लाख ७१ हजार ७८४ रुग्ण निरोगी झाले आहेत. भारताचा रिकव्हरी रेट ७७.७४% आहे. असे असले तरी देशात अजूनही ९ लाख १९ हजार १८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशातील कोरोनाचा आकडा ४४ लाखांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे आता देशातील नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *