सिक्सर किंग युवराज सिंग कमबॅक करण्याची शक्यता, बीसीसीआय लिहिले पत्र

Chance to yuvraj sing comeback in cricket

२०११च्या विश्वचषकात मालिकावीर ठरलेल्या युवराजने मागील वर्षी जून महिन्यात क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता युवराज सिंहने पुन्हा क्रिकेटमध्ये कमबॅक करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब क्रिकेट संघ म्हणजेच पीसीएच्या विनंतीनंतर निवृत्ती घेतलेल्या युवराजने पुनरागमन करण्याचं ठरवंल. 

पीसीए सचिव पुनीत बाली हे पहले व्यक्ती होते, ज्यांनी ३८ वर्षीय युवराजसमोर पंजाब क्रिकेटसाठी पुनरागमन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. युवराज सिंहने यासंदर्भात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांना पत्र लिहिल्याचंही पुनीत बाली यांनी सांगितलं.

क्रिकबझ’शी बोलताना युवराज म्हणाला की, “सुरुवातीला हा प्रस्ताव स्वीकारण्याबाबत मला खात्री नव्हती. मी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळणं बंद केलं होतं. मात्र जर मला बीसीसीआयकडून परवानगी मिळाली असती तर जगभरातील इतर प्रथम श्रेणी फ्रॅन्चायझी लीगमध्ये खेळणं मला सुरु ठेवायचं होतं. परंतु पुनीत बाली यांच्या प्रस्तावाकडे मला दुर्लक्ष करता आलं नाही. मी यावर फारच विचार केला, जवळपास तीन ते चार आठवडे. मला फार विचार करुन घेतलेल्या निर्णयाची गरज नव्हती हे अखेर माझ्या लक्षात आलं.”

पंजाबचे युवा खेळाडून शुभमन गिल, अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंह आणि अनमोलप्रीत सिंह यांच्यासोबत मागील काही महिन्यात नेटमध्ये काम करताना, सराव करताना युवराजला या खेळाप्रती प्रेरणा आणि प्रेम पुन्हा जाणवू लागलं. त्यामुळे आता भारतीय संघाचा सिक्सर किंग युवराज सिंह पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर दिसण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *