महापौर किशोरी पेडणेकरांच्या विरोधात भाजपा अविश्वास ठराव मांडणार ?

BJP will table a no-confidence motion against Mayor Kishori Pednekar

सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष मुंबईकडे लागले आहे. पहिले सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण व त्यानंतर कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यातील वाद वाढतच आहे. त्याच पार्श्व भूमीवर शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी आता भाजपनं आणखी कंबर कसली आहे. कोविड १९ च्या मुद्द्यावरून मुंबईच्या महापालिकेच्या (BMC) महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात भाजप अविश्वास ठराव मांडणार आहे. सभागृहाची बैठक तातडीनं बोलवावी असून यासाठी भाजपचं महापौरांना पत्र लिहिलं आहे. मुंबईत कोविड काळात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप भाजपनं केला आहे. या भ्रष्टाचारावरुन भाजप महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडणार आहे.

कोरोनाकाळात मुंबई महापालिका प्रशासनानं अनेक वस्तूंची जास्त दरात खरेदी केली आहे. याबाबत अनेक वेळा तक्रार करण्यात आली आहे. पण त्याकडे कुणी लक्षच देत नाही असा भाजपचा आरोप आहे. मनमानी कारभार करणाऱ्या मुंबई महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी पालिका सभागृहाची बैठक आयोजित करावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आता महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. याबाबत अन्य पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा करण्यात आली आहे. अशी माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *