भारताची मोठी झेप ! स्वदेशी बनावटीच्या हायपरसोनिक व्हिकलची यशस्वी चाचणी.

India successfully test fires hypersonic missile

भारताने आज पुर्णपणे स्वदेशी बनावटीचे हायपरसोनिक टेक्नोलॉजी डिमोन्स्ट्रेटर व्हिकलची यशस्वी चाचणी केली. हे देशाच्या भविष्यातील क्षेपणास्त्र प्रणाली आणि एरियल प्लॅटफॉर्मसाठी महत्त्वाचे सिद्ध होईल. Hypersonic propulsion technology वर आधारित हे स्क्रॅमजेट एअरक्राफ्ट संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केले आहे. ओडिसाच्या बालासोर येथे ही चाचणी पार पडली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कामगिरीबाबत डीआरडीओला शुभेच्छा दिल्या. राजनाथ सिंह यांनी ट्विट केले की, मी डीआरडीओच्या वैज्ञानिकांचे पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्या दिशेने केलेल्या या महत्त्वपुर्ण कामगिरीसाठी अभिनंदन करतो. मी या प्रोजेक्टशी संबंधित वैज्ञानिकांशी चर्चा केली व या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. भारताला त्यांच्यावर गर्व आहे.

हे स्क्रॅमजेट एअरक्राफ्ट आपल्यासोबत दीर्घपल्याच्या आणि हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्रांना घेऊन जाऊ शकते. जगातील कोणत्याही कोपऱ्यातील शत्रूच्या ठिकाणाला अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात निशाणा बनवू शकते. भारत अशी कामगिरी करणारा जगातील केवळ चौथा देश आहे. याआधी अमेरिका, चीन आणि रशियाने असे तंत्रज्ञान तयार केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *