वाह रे देसी जुगाड. ! जिम मधील सायकलला बनविले धान्य दळण्याचे साधन.

Women made desi jugad from jym cycle

भारतातील लोकं कधी काय जूगाड करतील याचा काही नेम नाही. भारतीयांकडून प्रत्येक समस्येवर काही ना काही जूगाड असतोच. आणि गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हटले जाते ते काही चुकचे नाही.  अशाच एका महिलेचा जिम सायकलचा उपयोग चक्क धान्य दळण्यासाठी करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नेटकरी देखील या कल्पकतेचे भरभरून कौतुक करत आहे.

आयएएस अधिकारी अवनिष शरण यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की जिम सायकलला मॉडिफाय केलेले आहे. त्यामुळे महिलेने सायकलवर पॅडल मारल्यानंतर धान्य देखील दळले जात आहे. खास गोष्ट म्हणजे काम जलद होण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या मशीनमुळे महिलेचा व्यायाम देखील होत आहे.

व्हिडीओ शेअर करत शरण यांनी लिहिले की, जबरदस्त शोध. कामही आणि व्यायाम देखील. कॉमेंट्री देखील शानदार. व्हिडीओमध्ये एक महिला मशीनचे फायदे सांगताना सांगत आहे की, हे आरोग्यासाठी देखील चांगले आहे. सोबत गहू दळताना व्यायाम देखील होतो. त्यामुळे या महिलेने केलेल्या जुगाडा मुळे तिचा व्हिडिओ सोशल मीडिया वर चागलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला आतापर्यंत ६ लाखांपेक्षा अधिक युजर्सनी बघितले आहे. सोबतच नेटकरी या देशी जुगाडाचे कौतुक देखील करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *