अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्यात तर निकाल ३१ ऑक्टोबर पर्यंत – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

Final year exam conduct in October

अंतिम वर्षाच्या परीक्षेवरुन देशात गेल्या काही दिवसांपासून मोठे पेच चालू होते. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या त्याच पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. अंतिम वर्षाची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेणार तसंच निकाल ३१ ऑक्टोबरपर्यंत लाऊ, असं उदय सामंत म्हणाले आहेत. प्रत्येक कुलगुरूंनी परीक्षा कशा घ्याव्यात, याबाबतचा आपला अहवाल समितीसमोर ठेवला, घरात बसूनच परीक्षा घेण्यास राज्यपालही राजी झाले आहेत, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली. 

१५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत प्रॅक्टिकल परीक्षा होतील आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होतील, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांनी मनात कुठलाच संभ्रम न ठेवता अभ्यासाला लागावं, असं आवाहनही उदय सामंत यांनी केलं. प्रॅक्टिकल परीक्षासुद्धा फिजिकली करायला लागू नये, अशी पद्धत अवलंबणार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं. 

परीक्षा घेण्याबाबत वेगवेगळे पर्याय समोर येत आहेत, त्यावर चर्चा सुरू आहे. परीक्षा मात्र सोप्या पद्धतीने होतील, यावर एकमत आहे. उरलेल्या बाबींवर आज रात्रीपर्यंत निर्णय घेऊ. आज अहवाल फायनल करुन उद्या दुपारपर्यंत परीक्षा पद्धती कशा घ्यायच्या यावर पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न असल्याचं उदय सामंत म्हणाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *