विश्वास नांगरे पाटील यांची मुंबई कायदासुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती.

Vishwas nangare Patil appointment as a joint commissioner of low and order at Mumbai

सध्या नाशिक येथे पोलिस आयुक्त पदी कार्यरत असलेले विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती मुंबई कायदासुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासुन सोशल मिडियावर त्यांच्या बदलीच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. त्याचबरोबर बदलीसाठी त्यांनी अर्ज केल्याची चर्चा होती. गणेशोत्सव पार पडताच मंगळवारी सुमारे ४५ अधिकाऱ्यांच्या बदलींच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वाक्ष-या केल्या. यावेळी मुंबईच्या कायदासुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी दीपक पांडे यांना त्यांच्या रिक्त पदावर संधी देण्यात आली आहे.

नांगरे पाटील यांनी दोन वर्षांपुर्वी नाशिकच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडून २ मार्च २०१९ स्विकारला होता. तसेच गेल्या वर्षी २ मार्च रोजी संजय दराडे यांच्याकडून जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी नाशिकच्या पोलीस अधिक्षक पदाचा पदभार यांनीही पदभार स्विकारला होता. अमरावतीच्या आयुक्तपदी सिंह यांची पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे, तर विनंती अर्जावरुन नांगरे पाटील यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *