चंद्रपुरातील लॉकडाऊन टळला, सरकारकडून लॉकडाऊनसाठी तूर्तास परवानगी नाही .

२९ ऑगस्टला चंद्रपुरात ३ सप्टेंबर पासून लॉकडाऊन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती, जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्येत होणारी वाढ बघता हा निर्णय करण्यात आला होता.

परंतु केंद्र व राज्य शासनाच्या नवीन गाईडलाईन्स मुळे लॉकडाऊन संदर्भातील निर्णयासंबंधी केंद्राकडून परवानगी आवश्यक असल्याने आम्ही तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला परंतु अजूनही त्या प्रस्तावाला मान्यता न मिळाल्याने हा लॉकडाऊन तूर्तास पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.

दरम्यान माझी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात लॉक डाऊन करू नये यासंबंधी राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा केली होती. चंद्रपूर जिल्‍हयात दिनांक ३ सप्‍टेंबर पासून कोणत्‍याही प्रकारचा लॉकडाऊन करण्‍यात येणार नाही, असे स्‍पष्‍ट आश्‍वासन राज्‍याच्‍या मुख्‍य सचिवांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे. हा लॉकडाऊन एखादया वार्डापुरता किंवा मर्यादीत भागापुरता असू शकेल मात्र संपूर्ण जिल्‍हयात लॉकडाऊन होणार नाही, असे मुख्‍य सचिवांनी स्‍पष्‍ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *