सफाई कर्मचारी ना थकीत वेतन त्वरित द्या, नगरसेवक अरविंद डोहे यांची मागणी.

Latest news in gadchandur

मागील सहा महिन्या पासून सफाई कर्मचाऱ्यांना वेतन दिले गेले नाही. त्यामुळे कोरोनासारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर काम करत असताना सुद्धा सफाई कामगारांचे वेतन मिळत नाही. त्यांनी वेतन मागणी केली तर त्यांना कामावरून काढून देण्याची तंबी देत असल्याची माहीती काही सफाई कामगार यांनी नाव न सांगण्याच्या अटी वर दिली. सध्या कोरोना महामारी चालु असून सफाई कामगार हे आपल्या जिवाची पर्वा न करता जीव ओतून काम केले आहे. तेव्हा त्यांचे एकीकडे कोरोनायोध्या म्हणून करण्यात येते आहे तर दुसरीकडे त्यांचे वेतन न प कडून थकविले जाता आहे ही शोकांतिका आहे. त्यामुळे सफाई कामगारांना तात्काळ त्यांचे वेतन देण्यात यावे अशी मागणी नगरसेवक अरविंद डोहे यांनी केली आहे.

सफाई कर्मचाऱ्याला वेतन नसल्याने त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे व त्यांची मनस्थिती पूर्णपणे खचली असून त्यांचे कामावर लक्ष नाही. संपूर्ण शहरात दुर्गधी पसरली असून डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आमनागरिकांचे जीव धोक्यात येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा नगरसेवक अरविंद डोहे यांनी मुख्याधिकारी यांना पत्राद्वारे विनंती केली की त्यांना किमान दोन तीन महिन्याचे वेतन देण्यात यावे अशी मागणी केली असून यावर काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *