पुरस्थित परीक्षा द्यायची कशी ? विदर्भातील विद्यार्थ्यांसमोर मोठे संकट.

Latest flood updates in vidarbha

विदर्भ आणि संघर्ष हे जणू अनुकरणचं आहे. संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असून आत्ताच कुठे शासनाकडून नवीन नियमाली जाहीर करून हळू हळू जनजीवन सुरू होण्यास सुरवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील घेण्यात येणार आहे. JEE आणि NEET यांच्या परीक्षांच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहे. मात्र विदर्भात पुरस्थिती असल्याने कित्येक विद्यार्थी पुराच्या तडाक्यात सापडले आहे. त्यामुळे अशा गंभीर परिस्थितीत परीक्षा द्यायची कशी ? हा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडला आहे.

दरम्यान विदर्भाच्या पूरग्रस्त भागातील जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निकाल दिला. आज होत असलेल्या जेईई परीक्षेच्या पार्श्वभूमी तातडीची सुनावणी घेण्यात आली. ज्यात न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि पुष्प गानेदीवाला यांच्या खंडपीठाने विद्यार्थ्यांना कोणताही दिलासा दिला नाही. ज्या ठिकाणी परीक्षा केंद्र आहेत, जिथे पूर नाही, जर एखादा विद्यार्थी पोहोचू शकला नाही तर त्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत रिप्रेझेन्टेशन करावे, त्यावर एनटीए निर्णय घेईल, कोणाचेही नुकसान होऊ देणार नाही, पण परीक्षा पुढे नाही, असं नागपूर खंडपीठाने म्हटलं.

विदर्भातील पुरस्थितीमुळे जेईई परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही : उदय सामंत

विदर्भातील पूरसदृश स्थितीमुळे या भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य नाही. ही पार्श्वभूमी लक्षात घेता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तत्काळ केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याशी संवाद साधला. सामंत यांनी विद्यार्थ्यांचे कसलेही शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नये, अशी विनंती केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांना केली आहे. ही विनंती त्यांनी तत्काळ मान्य करीत या भागातील एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *