राज्य सरकारच्या नव्या गाईडलाइन्स जारी, ई पास रद्द, जिल्हाबंदी समाप्त.

Maharashtra government new guidelines declare today

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात लागू करण्यात आलेली जिल्हाबंदी अखेर आज समाप्त झाली आहे. राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास अखेर राज्य सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही. राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत, त्याची नियमावली आज जाहीर झाली आहे.

राज्य सरकारच्या नव्या गाईडलाईननुसार, हॉटेल आणि लॉज सुरू होणार आहेत. मात्र मेट्रो, सिनेमा गृह बंदच राहणार आहेत. तर मुंबई आणि एमएमआर मध्ये शासकीय कार्यालय ३० टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत, तर उर्वरित महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *