ब्रेकिंग न्यूज…! देशाचे माझी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

Former president Pranav mukharji passes away today

देशाचे माझी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झालं ते ८४ वर्षाचे होते. काही दिवसांपूर्वी त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याच दरम्यान त्यांना कोरोनाची देखील लागण झाली होती. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. अखेर आज त्यांचा मृत्यू सोबतचा संघर्ष संपला आणि त्यांची प्राणज्योत मावळली.

प्रणव मुखर्जी यांनी २०१२ ते २०१७ पर्यंत देशाचे राष्ट्रपती पद सांभाळले होते. ते देशाचे तेरावे राष्ट्रपती होते ते काँग्रेसचे दिग्गज नेते होते. माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचा जन्म ११ डिसेंबर १९३५ रोजी पश्चिम बंगला येथील बिरभूम येथे झाला. पाच दशकांहून अधिक त्यांची राजकीय कारकिर्द आहे. त्यांनी परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, वाणिज्य मंत्री आणि अर्थमंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे.  इतिहास, राज्यशास्त्र, कायदा या क्षेत्रातलं पद्व्युत्तर शिक्षण घेतलं होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *