वैनगंगा नदीला पूर, चंद्रपूर आष्टी मार्ग बंद

Flood to Wainganga river Chandrapur Ashti road closed

गोसीखुर्द प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने वहिनी गंगा नदीला पूर आला असून यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जोडणारा आष्टी मार्ग बंद झाला आहे. गोसेखुर्द धरणातून तब्बल २२ हजार ७८२ क्‍यूमेक्‍स पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील नदी, नाल्या फुगत असून जिल्ह्यात पुराची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर नदी, नाल्यांच्या काठावरील नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून भंडारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये याचा फटका बसला आहे.

इतिहासातील सर्वांत मोठा विसर्ग

गोसेखुर्द धरणातील जलसाठाही प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शनिवारी दुपारी ३ वाजता या धरणाचे २५ दरवाजे ३ मीटरने, तर ८ दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून २२ हजार ७८२ क्‍यूमेक्‍स पाणी सोडण्यात येत आहे. गोसेखुर्दच्या आजपर्यंतच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा विसर्ग आहे. गोसेखुर्द धरणातून २४ ऑगस्ट २०१३ रोजी १६ हजार क्‍यूमेक्‍स, तर ९ सप्टेंबर २०१९ रोजी १३ हजार ७३९ क्‍यूमेक्‍स पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी सर्वाधिक पाणी सोडण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *