राज ठाकरेंचा मनसैनिकाला फोन, म्हणाले “ काही त्रास नाही ना झाला”

Raj Thackeray clarify about current news

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर घरी असले तरी मात्र त्यांचे लक्ष अवघ्या महाराष्ट्राकडे आहे. त्याचेच उदाहरण वेळोवेळी मिळत आहे. कोरोनाच्या काळात सर्वसामान्य जनतेला महावितरण कडून भरघोस विजबिले पाठविण्यात आली. याच्याच निषेधार्थ शिरूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत महावितरनच्या अधिकार्यारच्या केबिनची तोडफोड केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तीन मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. बारा दिवसांनी त्या कार्यकर्त्यांची पोलिस स्टेशन मधून सुटका झाली. सुटका झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलन करणार्या. कार्यकर्त्यांना फोन करून त्यांची विचारपूस केली.

राज ठाकरे यांनी संजय कुटे या आपल्या कार्यकर्त्याला फोन करून विचारपुस केली यावेळी त्यांनी “काही त्रास नाही ना झाला” असे प्रांजळपणे विचारले व आंदोलन केल्या बद्दल सर्वांच अभिनंदन देखील केलं.

कोरोनाच्या काळातील विजबिल मोठ्या प्रमाणात आल्याने सर्वसामान्य लोकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. आपले विजबिल कमी करण्यासाठी अनेक लोकं कार्यालयात चकरा मारत होते. अधिकारी जागेवर राहत नाही आधीच कोरोनामुळे त्रासलेल्या लोकांना होत असल्याचे मनसेकडून सांगण्यात येत होते परंतु महावितरणच्या अधिकार्यां कडून उडवाउडवीचे उत्तरे मिळत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयावर थेट मोर्चा काढला व महावितरणच्या अधिकार्याकचे केबिनची तोडफोड केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *