धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी गडचांदूर भाजपाच्या वतीने घंटानाद आंदोलन

Latest update in gadchandur

धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी संपूर्ण राज्यात भाजपाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर आज गडचांदूर शहरात भारतीय जनता पार्टी गडचांदूर तर्फे महाआघाडी सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारने दिनांक ४ जूनला देशात सर्व धार्मिकस्थळे नियम अटीनुसार खुले करण्याचे परिपत्रक जाहीर केले. काही राज्यामध्ये बहुतांश सर्वच धार्मिक स्थळ मंदिर, मज्जीद, चर्च, गुरुद्वारा, बोधविहार व जैन मंदिरे खुले करण्यात आले आहे. परंतु आपल्या राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने यावर कुठलाही विचार विनियम अजूनही केलेला नाही. अनेकदा भक्तांकरिता धार्मिक स्थळ खुले करण्याकरिता धार्मिक संघटनेने शासनांकडे मागणी केली आहे. या सरकारने यावर कुठलाही विचार केला नाही. उलट व्यसनाधीन लोकाकरिता दारूची दुकाने चालू केले. जेव्हा की नशेत असताना त्यांचे कडून शासनाच्या नियमाचे उलन्घन होऊ शकते यामुळे जनतेत नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे.

मागील सहा महिन्यापासून लोक घरी राहून लोकांच्या मनावर तणाव निर्माण झालेला आहे. अश्या वेळेस भक्तांकरिता धार्मिक स्थळ खुले केल्यास मानसिक समाधान मिळू शकते. परन्तु शासनाकडून जनतेच्या भावनावर सर्रास दुर्लक्ष होत आहे. म्हणून सरकारचे लक्ष वेधण्याकरीता प्रदेश भाजपा व जिल्हा भाजपाच्या सुचने नुसार आज गडचांदूर येथे प्रभाग क्र २ यशवन्त नगर, बस स्टॉप, गांधी चौक, दुर्गा माता मंदिर, अचानक चौकात भारतीय जनता पार्टिकडून घंटानाद आंदोलन करण्यात आले व मा. मुख्यमंत्री यांना ईमेल द्वारे निवेदन पाठवून भावना व्यक्त केल्या आहे.

latest update in gadchandur

जनतेच्या भावनेचा आदर करून अटी,नियमासह सर्व धार्मिक स्थळ खुले करावे अशी मागणी केली आहे. या वेळी भाजपाचे शहर अध्यक्ष सतीश उपलेंचिवार, निलेशजी ताजने, नगरसेवक अरविंद डोहे, रामसेवक मोरे, हरीश घोरे, हरिभाऊ मोरे, मधूकरजी कोवळे, संदीप शेरकि, शिवाजी शेलोकर, कृष्णा भागवत, गजानन शिंगरू, गोपाल मालपाणी, राकेश अरोरा, सत्यदेव शर्मा, अरविंद कोरे, शेख महेबूब भाई, अशोक दरेकर, परशुराम मुसळे, बबलू रासेकर, योगेंद्र केवट, संदीप निसाद, रोहन काकडे, सचिन गुरनुले, वैभव पोटे, तुषार देवकर, गणपत बुरटकर, प्रकाश काटिसकर, माजी नगराध्यक्ष सौ विजयालक्ष्मी डोहे, सौ रंजना मडावी, अँड दिपक मंथनवार, सौ राजश्री आसुटकर, सौ प्रतिभा जोगी, सौ अल्का पारखी, सौ चित्रांजली बतखल, सौ मंजूषा कटिस्कर, सौ मंदाताई खामनकर, सौ मनजित कौर हजरा , सौ सोनू देरकर सहित सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *