चंद्रपूर जिल्ह्यात वाढतोय कोरोनाचा प्रादुर्भाव, कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता

Janata curfew will announce in chandrapur district for seven days

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाचां प्रादुर्भाव वाढत असून जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या २०७४ वर पोहचली आहे. सुरवातीला कोरोनापासुन दूर असणाऱ्या चंद्रपुर जिल्ह्यात वाढत्या कोरोना रूग्णांमुळे चंद्रपूरकरांची चिंता वाढवत आहे.

गेल्या २४ तासात १७८ नवीन बाधित पुढे आले आहेत .जिल्ह्यात आत्तापर्यंत ११७६ बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील १९ सह एकूण २२ कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात रोज कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसेंदिवस १०० च्या जवळपास कोरोनाबाधित जिल्ह्यात आढळून येत असल्याने समोरचा काळ हा चंद्रपूरकरांसाठी बिकट असणार याकरिता चंद्रपुरात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करावेच लागेल अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. त्यामूळे येत्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात कडक लॉक डाऊन होण्याची शक्यता आहे.

नियमांचे पालन करावे, सुरक्षा बाळगावी आणि आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *