दारूचे दुकाने उघडण्यात जो उत्साह दाखविला त्यातील अर्धा तरी मंदिरे उघडण्यात दाखवा – देवेंद्र फडणवीस

Devendra fadanvis statement on Maratha reservation

आज राज्यभरात भाजपाच्या वतीने धार्मिक स्थळे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘दारुची दुकाने उघडण्याने काय होते आणि मंदिरं खुली केल्याने काय होतं, हे सर्वांना कळते. जो उत्साह दारुची दुकाने उघताना दाखविला. त्यातील अर्धा उत्साह तरी मंदिरं उघडण्यासाठी सरकारने दाखवायला हवा’ अशी प्रतिक्रिया दिली.

“कोरोनाबाबत आम्ही सहकार्याची भूमिका घेतली असून सरकारकडूनही प्रो अॅक्टिव्ह रोल असला पाहिजे. धार्मिक स्थळं उघडली आणि कोरोना वाढला असे आतापर्यंत कुठेही घडलेलं नाही,” अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील मंदिरं खुली करावीत या मागणीसाठी भाजपतर्फे राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. त्याबाबत कोल्हापूर आणि सांगलीत बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

प्रशासनापेक्षा शासनाने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. शासन ज्या पद्धतीने चालते, त्याच पद्धतीने साधारणत: प्रशासन पुढे जात असते. सरकार आणि मंत्री लक्ष घालतील, तेव्हाच निर्णय प्रक्रियेला वेग येईल. आपली कार्यक्षमता लपवण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवलं जातं आहे. त्यामुळे निर्णय मातोश्रीवरुन घ्या किंवा वर्षावरुन घ्या. धार्मिक स्थळं उघडली आणि कोरोना वाढला असं कोठेही घडलेलं नाही, असे फडणवीस म्हणाले. सुशांत सिंह प्रकरणात आम्हाला विनाकारण ओढण्याचा प्रयत्न होतो आहे,” असेही देखील त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *