कोरोनायोध्या डॉक्टरने अ‍ॅम्ब्युलन्स चालवत वाचविले कोरोनारुग्णाचे प्राण

doctor saved life of corona patient by driving ambulance

पुण्यामध्ये कोविड रूग्णालयात कोरोनाबाधीतांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरने चक्क ३० किलोमीटर अ‍ॅम्ब्युलन्स चालवत एका कोरोना रुग्णाचे प्राण वाचविले आहे.

पुण्यातील मार्केटयार्ड येथील कोविड सेंटरमध्ये ७१ वर्षीय रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा अचानक कमी झाली. त्यानंतर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये तातडीनं हलवणं आवश्यक होतं. तेव्हा डॉ. रंजीत निकम यांनी स्वत: अ‍ॅम्ब्युलन्स चालवून रुग्णाला जवळच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं.

मार्केटयार्ड परिसरात उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये डॉ. रंजीत निकम आपलं कर्तव्य बजावत होते. मात्र, सोमवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास एका कोरोनाबाधित वयोवृद्ध रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्र कमी झाल्याचं निदर्शनास आलं. वरिष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानंतर रुग्णाला एखाद्या मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, कोविड सेंटरच्या अॅम्ब्युलन्सचा चालक अचानक आजारी होता. गाडी चावण्याची त्याची परिस्थिती नव्हती.

अखेर रुग्णाला सलाइन चढवण्यात आलं. रुग्णाची प्रकृती सातत्यानं खालावत होती. अखेर डॉ. रंजीत निकम यांनी स्वत: अ‍ॅम्ब्युलन्स चालवण्याचा निर्णय घेतला. रुग्णाला अनेक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र, बहुताश हॉस्पिटलमध्य आयसीयू बेड शिल्लक नसल्याचं समजलं. अखेर रुग्णाला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णावर वेळेच उपचार झाल्यामुळे त्याचे थोडक्यात प्राण बचावले. आता रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. रंजीत निकम यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांकडून शक्य असेल तेवढी मदत करत असल्याचे या घटनेतून दिसून येत आहे. आपले कर्तव्य करतांना अगदी ड्रायव्हर सुद्धा बनायची तयारी असल्याची या कोरोनायोध्याने दाखवून दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *