चंद्रपूर जिल्ह्यात आज सर्वाधिक कोरोना रुग्ण, दोन कोरोनाबाधीतांचां मृत्यू

Janata curfew will announce in chandrapur district for seven days

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून चंद्रपूर जिल्ह्यात आज सर्वाधिक कोरोनाबाधीतांची नोंद झाली आहे. आज जिल्ह्यात २४ तासात कोरोना संक्रमित १३२ बाधित आढळून आल्याने आत्तापर्यंत कोवीड संक्रमित झालेल्या बाधितांची  संख्या १७९९ झाली आहे. आतापर्यंत १०८१ बाधित कोरोनामुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या ६९६ बाधित उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासात दोन मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये मौलाना आझाद वार्ड बल्लारपूर येथील ५२ वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. आज २७ ऑगस्टच्या पहाटे दिड वाजता ६० वर्षीय पठाणपुरा वॉर्ड चंद्रपूर येथील बाधित पुरूषाचा मृत्यू झाला.

२४ तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील सर्वाधिक ५५ बाधित पुढे आलेले आहेत. त्याचबरोबर बल्लारपूर २, मुल  १८, ब्रह्मपुरी ५, वरोरा व राजुरा येथील प्रत्येकी ८, सावली २०,  कोरपना ११, भद्रावती चार तर गोंडपिपरी येथील एक बाधीत ठरला असून असे एकुण १३२ बाधितांचा समावेश आहे.

सुरवातीला कोरोनापासुन लांब असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचां प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणत वाढत असून जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

राज्यातील कोरोनाचा आढावा

राज्यात गेल्या २४ तासांत ३५५ कोरोना बाधितांना प्राणास मुकावे लागले आहे. आज दिवसभरात १४ हजार ७१८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर ९ हजार १३६ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ७ लाख ३३ हजार ५६८वर पोहचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *