साइशांति युवा गणेश मंडळा तर्फे आयोजित रक्तदान शिबीर संपन्न, ५८ रक्त दत्यांनी केले रक्तदान

साइशांति युवा गणेश मंडळा तर्फे सलग दुसर्‍या वर्षी आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन नगरसेवक अरुण भाऊ डोहे यांनी केले, तर सदर शिबिरात युवकांचा उत्तम प्रतिसाद बघायला मिळाला. ५८ रक्तदात्यांनी रक्तदान करून कोरोना सारख्या महामारीचा पार्श्व भूमीवर रक्त दात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदान करणार्‍या रक्तदात्यांचे मंडळाने मानले आभार मानले.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी वैभव राव, नीलेश चीने, अविष्कार मेश्राम, अतुल बोबडे आकाश गायकवाड, गौरव राव, वैभव डोहे, सुहास बोंडे, श्रीनिवास पवार, सुमित नागे, दत्तू पानघाटे,  मुख्तार अली,अक्षय मेश्राम, अभिजित पाचभाई, संकेत लांडे, ऋषि चटप, समीर ये‍डमे व अन्य सदस्यांनी अथक प्रयत्न केले.

“आजच्या आयोजित रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात येऊन रक्तदान केले त्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे आभार. व शिबीर शासकीय नियमाचे पालन करून यशश्वी पार पाडल्या बद्दल मंडळाच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन”
-वैभव राव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *