गडचांदुरात नगर परिषदच्या शासन व प्रशासना विरुद्ध भाजपचे अनोखे आंदोलन.

काही दिवसांपूर्वी भाजपाच्या नगरसेवकांनी गडचांदुरतील अस्वच्छतेकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत असून मागील चार महिन्यांपासून गडचांदुरातील नाल्यांची सफाई, तसेच कीटकनाशक फवारणी देखील करण्यात आली नसून इतरही अनेक स्वच्छतेचे कामे नियमित होत नसल्याचा आरोप नगरसेवक अरुण डोहे व रामसेवक मोरे यांनी केला होता. तसेच या समस्येवर तोडगा न काढल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.

त्याच पार्श्वभूमीवर नगरसेवक अरविंद डोहे व रामसेवक मोरे यांनी वारंवार निवेदन दिले तोंडी माहिती देऊन सुद्धा दुर्लक्ष करण्यात येत असल्याने शेवटी नगरसेवक अरविंद डोहे ,रामसेवक मोरे यांच्या नेतृत्वात जनतेच्या सहकार्यातून आकाश्यात काळे फुगे सोडून,ठिकठिकाणी काळे झेंडे,व फलक लावून नगर परिषद शासन व प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.

हे आंदोलन शासन व प्रशासनाला हा संदेश असून यानंतर ही असेच दुर्लक्ष केल्यास यापेक्षाही मोठे आंदोलन करू असा इशारा अरविंद डोहे यांनी यावेळी दिला. या आंदोलनात भाजपाचे कार्यकर्ते महेशजी शर्मा, शिवाजी सेलोकर, अरविंद डोहे, नगरसेवक रामसेवक मोरे, सतीश उपलेंचिवार, निलेश ताजने, हरीश घोरे, संदीप शेरकि, अरविंद कोरे, बबलू रासेकर, अजीम बेग, कुणाल पारखी, सुयोग्य काँगरे, विनोद कावळकर, सुनील जोगी, परशुराम मुसळे, सौ विजयालक्ष्मी डोहे माजी नगराध्यक्ष, सौ रंजना मडावी, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *